कोरोनामहाराष्ट्र

पाच महिन्यांपासून बंद असलेली पुण्यातील बससेवा अखेर सुरू

पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे बससेवा बंद करण्यात आली होती. आता पुण्यात आजपासून पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्यात आली आहे. पण पहिल्या टप्प्यात नव्या नियमांनुसार फक्त २५ टक्केच बसेस १९० मार्गांवर धावणार आहेत.

१ जूनपासून राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत शहरात नागरिकांची वर्दळ वाढली. पण ज्यांच्याकडे खाजगी वाहने नाहीत अशा नागरिकांची गैरसोय होत असल्याने, बससेवा सुरू करण्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात ऑगस्ट महिन्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी यावर चर्चा करण्यात आली होती.

गणेशोत्सवामध्येच बससेवा सुरू करण्याबाबत काहींनी मागणी करण्यात आली होती. पण त्यावेळी गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळावी याकरिता ३ सप्टेंबरपासूनच बससेवा सुरू करावी अशी भूमिका प्रशासनाने घेतली.

त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पीएमपीएमएलची वाहतूक सेवा आजपासून सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात पीएमपीकडील १३ आगारांकडून १९० मार्गांवर ४२१ गाड्यांचे संचलन होणार आहे. पण त्यासाठी नियमांचे काही पालन करावे लागणार आहे. या बससेवेला अटी व नियम लागू करण्यात आले आहेत.