महाराष्ट्रराजकारण

“नाव घेऊन सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मला त्रास झाला”

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपामध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षावर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही. पक्षच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार, असे म्हणत खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. तसेच मी पक्षाविरोधात बोललेलो नाही. मला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्रास झाला हे मी नाव घेऊन सांगतो, असा आरोपही खडसे यांनी केला.

एकनाथ खडसे यांच्यावरील जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज खडसे फार्महाऊस येथे ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन केले.

यावेळी खडसे यांनी अन्यायाबाबत स्वपक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले माझ्यावर अन्याय झाला आहे. पक्षच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार. मुखमंत्री तेव्हा अंजली दमानिया यांना वेळ देत भेटत होते. पण खडसें याना भेटत नव्हते. पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. खडसे यांना निर्दोष असतांना क्लिनचिट मिळाली नाही, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला. अनेक दिवसांपासून खडसे पक्षावर टीका करत आहेत मात्र पक्ष त्यांची दखल घेत नाहीत.