कृषी महाराष्ट्र

राज्यात उद्यापासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

या आठवड्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाःकार माजवला होता. शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. बळीराजा संकटात असतानाही आतापर्यंत कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आली नाही. अशात आता आणखी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उद्या सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात मागील आठवड्यासारखा कमी दाबाचा पट्टा तयार होत […]

कृषी महाराष्ट्र

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

भाजपा सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचं थांबले नसल्याची स्थिती आहे. एनसीबीआरनं वर्ष २०१९मधील देशातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली असून, या आकडेवारीनं महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकली आहे. देशातील शेतकरी आत्महत्यांच्या क्रमवारीत दुर्वैवानं महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. २०१९ या वर्षात दहा हजार २८१ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. कृषी सुधारणांसह कर्जमाफी करत […]

कृषी महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी छत्रपती सहकारी कारखान्यात आत्मदहनाचा प्रयत्न

राज्यात अनेक साखर कारखान्यांनी उसाची एफआरपी दिली नाही. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहे. आज इंदापूर तालुक्यातील श्री. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने उसाच्या उर्वरित एफआरपीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहे. अनेक शेतकऱ्यांवरही उपास मारीची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे छत्रपती कारखान्याने शेतकऱ्यांना […]

कृषी महाराष्ट्र

प्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट

पुणे-बेंगळुरू महामार्गावर कोल्हापूरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर किणी हे गाव आहे. या गावातील युवा शेतकरी सुमित दणाणे यांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे. एम.टेक (मेटॅलर्जी) पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कॉलेजमध्ये अधिव्याख्यातापदी नोकरी केलीआहे. परंतु शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच विचारातून त्यांनी नोकरी सोडून घरच्या शेतीला प्राधान्य दिले. अशोक दणाणे या […]

कृषी महाराष्ट्र

अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी

आज कृषी विधेयकावरून राज्यसभेत मोठा गोंधळ बघायला मिळाला. यामध्ये देखील राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळवून देण्यात अखेर मोदी सरकारला यश आले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी ही विधेयके सभागृहात मांडली. यानंतर विरोधकांनी तिन्ही विधेयकांना कडाडून विरोध केला. या मुद्द्यावर वादळी चर्चाही झाली. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील खासदारांनी […]

कृषी महाराष्ट्र

पुढचे 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांमध्ये अलर्ट

राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात हलक्या स्वरुपाचा तर तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसरात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. […]

कृषी महाराष्ट्र

अखेर केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. तसेच विरोधकांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली होती. पण अखेर मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. सोमवारी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सोमवारपासून बंदरात आणि सीमेवर कांदा अडवून ठेवण्यात आला होता. मात्र आता अडवून […]

कृषी महाराष्ट्र

शेतकऱ्यांची राज्यपालांकडे मागणी; कंगनाची भेट घ्यायला वेळ, मग कांदा उत्पादकांनाही भेटा

१४ सप्टेंबरला अचानक केंद्राने कांदा निर्यातबंदीची भूमिका घेतली. या संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका सैनिकास भेट दिली होती. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध सिनेतारका कंगना राणौत हिचे मुंबईतील कार्यालय पालिकेने तोडल्याच्या तक्रारीवर तिलाही भेटले होते. इथे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने तर राज्यात लाखो शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त […]

कृषी महाराष्ट्र

भाजप खासदारानं दिली कांदा निर्यात बंदीबाबत दिलासादायक माहिती

केंद्र सरकारनं कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटला आहे. निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकारी आक्रमक झाला आहे. यावर लवकरच तोडगा निघणार असून केंद्र सरकारच्या वतीने कांद्यावर लावण्यात आलेली बंदी लवकरच उठवण्यात येईल. कांदा प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. यासंदर्भात भामरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले […]

कृषी महाराष्ट्र

शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी- सदाभाऊ खोत

कांद्याबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सध्या राजकारण तापले आहे. कांदा जीवनाश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्यानंतर बाजारपेठेत हस्तक्षेप करणार नाही, हे केंद्र सरकारने दिलेले वचन खोटे आहे का?. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असतांना निर्यातबंदी करण्याचा सरकारला अधिकार आहे काय? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केला आहे. गेल्या सरकारमध्ये खोत हे भाजप सरकारमध्ये मंत्री […]