देश-विदेश महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना दिली एक रूपयाची दंडाची शिक्षा

प्रशांत भूषण यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानना खटल्याच्या शिक्षेकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल आज जाहीर केला. मागील सुनावणीच्या वेळी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. प्रशांत भूषण यांना शिक्षा देऊ नये, अशी विनंती अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी मागील सुनावणीत न्यायालयाला केली होती. आज […]

देश-विदेश महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी तिरुपती देवस्थानचा मोठा निर्णय

श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुपती देवस्थानालाही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. देशातील अन्य मंदिरांप्रमाणे तिरुपती देवस्थानालाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊन होण्याआधी तिरुमाला येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात भाविकांकडून मोठया प्रमाणावर रोख रक्कम अपर्ण केली जायची. मात्र कोरोनामुळे यामध्ये अडचणी येऊ लागल्या. आता हे प्रमाण प्रचंड घटले आहे. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनला रोकड टंचाईचा सामना करावा […]

देश-विदेश लक्षवेधी

भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना जवानांनी घातलं कंठस्नान

Newsliveमराठी – भारतार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी ठार केलं आहे. पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेवर ही कारवाई करण्यात आली. घुसखोर सीमारेषा पार करुन भारतात शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच बीएसएफच्या जवानांनी त्यांना पाहिलं. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत घुसखोर ठार झाले. बीएसएफकडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, […]

तंत्रज्ञान देश-विदेश राजकारण

चीनला झटका – भारताने केलं ४४ ट्रेनचं कंत्राट रद्द

Newsliveमराठी – केंद्र सरकारकडून सेमी हाय स्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. यासोबत केंद्र सरकारने चिनी कंपनीला जोरदार झटका दिला आहे. रेल्वेकडून पुढील एका आठवड्यात नव्याने कंत्राट काढण्यात येणार असून केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे. पीटीआयने याबाबतच वृत्त दिलं आहे. ४४ […]

कोरोना देश-विदेश

चिंताजनक – देशात २४ तासांत ६९ हजार करोनाबाधित; रुग्णसंख्या ३० लाखांच्या पार

Newsliveमराठी – भारतात चोवीस तासात सर्वाधिक ६९,८७८ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या २९.७५ लाखांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. भारताचा करोनामुक्तीचा दर काल ७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिवसभरात ६२,२८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २१.५ लाखांवर पोहोचली आहे. तर करोनामुळं मृत्यूचा दर […]

कोरोना देश-विदेश राजकारण

करोनाच्या काळातील निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

Newsliveमराठी – करोनाच्या कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने काल व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे (ईव्हीएम) बटण दाबण्यासाठी मतदारांना हातमोजे उपलब्ध करून देण्यात येणार असून अलगीकरणात असलेल्या रुग्णांना मतदानाच्या दिवशी अखेरच्या एका तासात मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. वापर केल्यानंतर विल्हेवाट लावता येतील असे हातमोजे देण्यात येण्याची शक्यता आहे. जो […]

कोरोना देश-विदेश

पर्यूषण पर्वासाठी तीन जैन मंदिरांत प्रार्थनेस मुभा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Newsliveमराठी – मुंबईतील तीन जैन मंदिरे पर्यूषण पर्वातील प्रार्थनेसाठी दोन दिवस २२ आणि २३ ऑगस्टला खुली करण्यास सर्वोच्च न्यायालयाने काल परवानगी दिली आहे. हा हंगामी निकाल फक्त पर्यूषण पर्वासाठी असून मुंबईतील अन्य धार्मिक सोहळ्यांसाठी विशेषत: गणेशोत्सवासाठी तसेच धार्मिक स्थळांसाठी लागू नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरात प्रार्थनेसाठी परवानगी […]

देश-विदेश शैक्षणिक

JEE, NEET परीक्षा पुढे ढकला; भाजपा खासदाराची मागणी

Newsliveमराठी – ‘जेईई २०२०’ आणि ‘नीट’ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच भाजपाचे दिग्गज नेते व राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्याकडे नीट व जेईई सारख्या परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आज या संबधी एक ट्विट करत म्हटले […]

देश-विदेश महाराष्ट्र

राम मंदिरासाठी 10 अब्ज रुपयांचा निधी गोळा करणार- विश्व हिंदू परिषद

अयोध्येतील राममंदिराचे भूमीपूजन नूकतेच पार पडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. त्यानंतर आता राममंदिर उभारणीला सुरुवात झाली आहे. राममंदिर उभारणीसाठी क्राऊड फंडिंगद्वारे लोकांकडून वर्गणी काढून 10 अब्ज रुपये जमा करण्याचा विचार विश्वहिंदू परिषद करत आहे. अयोध्येतील भव्य आणि महत्त्वाकांक्षी राम मंदिराच्या निर्मितीला हा एवढा पैसा उभा करण्याच संकल्प विश्व हिंदू परिषदेचा आहे. […]

देश-विदेश राजकारण

भारताला पाकिस्तानकडून पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी

Newsliveमराठी – वारंवार वादग्रस्त वक्तव्यांवरून कायम चर्चेत राहत असलेल्या पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा एकदा भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी देत पाकिस्तानकडे असलेला अणूबॉम्बची पोहोच आसामपर्यंत असल्याचं म्हटलं. तसंच या अणुहल्ल्याचा मुस्लिमांना कोणतंही नुकसान होणार नसल्याचंही ते म्हणाले. “जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर ते अखेरचं युद्ध असेल,” अशी […]