बातमी महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह बेघर झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

Newslive मराठी- फलटण, दि. 22 (रणजीत कांबळे) गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचा हाता तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीच्या पावसाने वाया गेले आहे. तसेच जिल्ह्यातील अनेकांची घरे वाहून गेली, तर काहींची घरे पडली आहे. यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली […]

इंदापूर बातमी

इंदापूर येथे कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

Newslive मराठी-  इंदापूर येथे कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या वतीने भूमीपूजनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ते काल पार पडले. यावेळी 567 लोकांनी रक्तगट तपासणी करून घेतली तर अनेकांनी रक्तदान केलं. देशासह राज्यात कोरोनाचा फ़ैलाव सुरू आहे. अशातच रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर भासत आहे. यामुळे ब्लड बँकांनी ऐच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करावीत, अस आवाहन […]

बातमी बारामती

नगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठामधील अनागोंदी कारभार थांबवा

Newslive मराठी – फलटण ( दि.17, रणजीत कांबळे) फलटण नगरपरिषद हद्दीतील मलटण आणि सुरेश पवार लाईला गेल्या अनेक वर्षांपासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे. तसेच या प्रभागासाठी मलटण क्षेत्रात दोन पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र तरीही या प्रभागातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मात्र नगरपरिषद हद्दीतील इतर प्रभागात पालिकेकडून पाणी पुरवठा सुरळीत होत […]

बातमी राजकारण

कंगनाला महाराष्ट्राचे गृहमंत्री धमकी देतात हे आम्ही खपवून घेणार नाही- किरीट सोमय्या

गृहमंत्री अनिल देशमुख कंगना रणावतला धमकी देत आहेत, हे आम्ही चालू देणार नाही, असे भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रत्येक मुंबईकर तिच्या या वक्तव्याशी असहमत आहेत. त्यामुळे कंगनाने तिचे वक्तव्य  मागे घ्यायलाच हवे, मात्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तिला धमकावणे हे आपण चालू देणार नाही, असे किरीट सोमय्या […]

बातमी

ऍम्ब्युलन्स वेळेत मिळत नसल्यामुळे पुणे महापालिकेच्या उपायुक्तांची मोटार फोडली

कोरोनामुळे निधन झाल्यानंतर पार्थिवावर दोन किमी अंतरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला नेण्यासाठी केवळ ऍम्ब्युलन्स मिळण्यात तीन तास आणि स्मशानभूमीत दोन तास वाट पाहावी लागली. यावर कात्रज येथील नगरसेवक आणि मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी महापालिकेच्या उपायुक्तांची मोटाराची काच फोडत आपला राग व्यक्‍त केला. त्याच्या साडूचे कोरोनामुळे निधन झाले. भारती हॉस्पिटल येथून […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

मी मुंबईला येतेय, कोणाच्या बापात हिंंम्मत असेल तर मला रोखून दाखवा- कंगणा

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राजकीय नेत्यांपासून ते अनेक कलाकारांनी तिच्यावर जोरदार टीका केली. कंगणावर राजकीय नेत्यांनीही मोठ्या प्रमाणात टीका केली. आता तिने सर्व टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी मुंबईला येत असून कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात कंगणाने […]

बातमी राजकारण

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली

Newsliveमराठी – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली आहे. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रणव मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाकडून प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. याआधी प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृतीत सुधारण होत असल्याची […]

देश-विदेश बातमी

दिग्दर्शक निशिकांत कामत काळाच्या पडद्याआड

Newsliveमराठी – ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. निशिकांत ५० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दृष्यम, मदारी, […]

बातमी

धक्कादायक – १३ वर्षाच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून क्रूरपणे हत्या

Newsliveमराठी – मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनामुळे चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशात अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या डोळ्यांसह शरीराच्या इतरही अवयव कापल्याची भयंकर घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन […]

खेळ बातमी

सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Newsliveमराठी – महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे . 2018 मध्ये रैनानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 आणि 2015मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. रैनानं इस्टाग्रामवर पोस्ट लिहिली की,”धोनी तुझ्यासोबत खेळण्याचा आनंद निराळाच होता. त्यामुळे तू निवृत्ती घेतल्यानंतर मीही तुझ्या या प्रवासात येण्याचा […]