महाराष्ट्र व्यापार

ऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे देशातील सर्वच व्यवहार आणि उद्योगधंदे ठप्प झाले. याचा परिणाम राज्याच्या अर्थचक्रावरही झाला होता. तसेच अनेकांच्या हातातले कामंही गेल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे. अशातच राज्य सरकारच्या वतीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट सुरु होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या […]

महाराष्ट्र व्यापार

लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्या तरुणाने केला स्वताच उद्योग सुरू, आता देतोय इतरांना रोजगार

कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाले आणि अनेक कंपन्या बंद पडल्या, अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली तर अनेकांना कंपनी मालकांनी पैसे देण्यास असर्थता दाखवली. अशा परिस्थितीत नाशिकमधील कंपनीतून नोकरी सोडून घरी आलेल्या येवला तालुक्यातील धामणगाव इथल्या महेश शिवाजी गवळी या तरुणाने खचून न जाता स्वत:चा एलईडी बल्ब बनवण्याचा छोटा उद्योग सुरु केला. शिवाय गावातील […]

महाराष्ट्र व्यापार

ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना आता टाटा समूह देणार टक्कर!

देशात उद्योग क्षेत्रात मोठे बदल घडताना दिसत आहेत. देशात फ्लिपकार्ट आणि अ‌ॅमेझॉन यांच्यात कायम स्पर्धा होताना दिसते. पण त्यातच रिलायन्स जिओ मार्टने यात पाऊल टाकलं. या सर्व ई-कॉमर्स कंपन्याची एकमेकांमध्ये झुंज चालू आहे. त्यातच आता टाटा समूह ई-कॉमर्स क्षेत्रात उतरत आहे. अनेक क्षेत्रात टाटा समूह कार्यरत आहे. आता टाटा समूह एक अ‌ॅप बनवण्याच्या तयारीत आहे. […]

आंतरराष्ट्रीय व्यापार

सरकारकडून रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी

Newslive मराठी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना आता व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देण्यासाठी सरकारनं देशात रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महासंचालनालयानं (डीजीएफटी) यासंदर्भात एक पत्रक काढलं त्यात, रंगीत टीव्हीसाठी असलेल्या आयात धोरणात बदल केले गेले असल्याची माहिती यात देण्यात आली […]

बातमी व्यापार

ऑनलाईन राख्या खरेदीमुळे दुकानदार चिंताग्रस्त

Newslive मराठी- दरवर्षी रक्षाबंधनाच्या अगोदर आठ दिवस शहरात ठिकठिकाणी वेगवेगळया प्रकारच्या राख्यांचे स्टॉल लावण्यात येतात. मोठ्या शहरांमध्ये बसस्थानक परिसर, मुख्य मार्गावर तसेच मुख्य बाजारपेठत मोठ्या प्रमाणात स्टॉल लावण्यात येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या रंग्याच्या आकर्षक राख्या खरेदी करण्यासाठी युवती व महिला चार दिवस अगोदरच बाजारपेठेत मोठी गर्दी करत असतात. मात्र यावर्षी राज्यात तसेच देशात कोरोनाचे शिरकाव करत […]

देश-विदेश महाराष्ट्र लक्षवेधी लाइफस्टाईल व्यापार

महाराष्ट्र राज्यात मॉल्स सुरु करण्याची तारीख ठरली; परंतु…

Newsive मराठी- महाराष्ट्र राज्य सरकारने लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यासोबतच महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासूनच बंद असलेले मॉल्स सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सना 5 […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी व्यापार

भारतानंतर अमेरिकेतही टिकटॉकसह चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची तयारी

Newslive मराठी-  काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं टिकटॉकसह काही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अमेरिकेनंही भारताच्या या निर्णयाचं समर्थनही केलं होतं. तसंच त्यांनीदेखील असं पाऊल उचलणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनंतर आता जपानदेखील टिकटॉकसह काही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. जपानमध्ये चीन पब्लिशर्सकडून तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपवर […]

लाइफस्टाईल व्यापार

सौंदर्यप्रसाधनांच्या मागणीत झाली मोठी घट

Newslive मराठी- गेले तीन चार महिने ब्युटी पार्लर, सलून बंद असल्याने आणि आता अनलॉक मधेही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद नसल्याने सौंदर्यप्रसाधनाच्या मागणीत 90 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कार्यालये बंद आहेत. शिवाय लग्नसोहळे, सामाजिक, सार्वजनिक कार्यक्रमांचे प्रमाण खूपच कमी असल्याने सौंदर्यप्रसाधनांचा वापर मर्यादित आहे. परंतु, याचा फटका सौंदर्यप्रसाधनाच्या विक्रेत्यांना बसला आहे. त्यात दुकानात सौंदर्यप्रसाधनांच्या तपासणी आणि […]

आंतरराष्ट्रीय देश-विदेश व्यापार

भारतात आर्थिक आणीबाणी लागू होणार ?

Newslive मराठी- भारतात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे व्यापार जगताला मोठा फटका बसला आहे. भारताचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात आर्थिक आणीबाणी लागू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 360 नुसार देशात आर्थिक आणीबाणीची घोषणा करु शकतात. देश गंभीर आर्थिक संकटात असताना ही आणीबाणी लागू करण्याची तरतूद राज्यघटनेत आहे. आजच आरबीआयनेही आर्थिक वर्ष आता […]

कृषी महाराष्ट्र व्यापार

मोदी सरकारचा मोठा निर्णय, कांद्याच्या निर्यातीवर बंदी

Newslive मराठी-  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. हा निर्णय तत्काळ लागू करण्यात आला आहे. देशभरात कांद्याच्या किमतीत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक […]