देश-विदेश बातमी शैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या बरोबर आता प्राध्यापकांनाही नकोय परीक्षा! याचिका दाखल

Newslive मराठी- राज्यात कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेयच्या की नको यावर एकमत होत नाही. यावरून राज्य व केंद्र सरकारमध्ये वाद देखील बघायला मिळाला. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना परीक्षा घेणे शक्य नाही. आयोगाच्या निर्णयाप्रमाणे राज्यात जवळपास 11 लाख विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल. अनेक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागेल. जे सद्य:स्थितीत शक्य नाही. […]

बातमी शैक्षणिक

अंतिम वर्षांच्या परीक्षा होणारच- युजीसी

Newslive मराठी- उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होत असल्याने परीक्षांना स्थगिती मिळेल वा त्या पुढे ढकलल्या जातील असे गृहित धरू नये, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात मांडली. याप्रकरणी पुढील सुनावणी 10 ऑगस्टला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय […]

देश-विदेश शैक्षणिक

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; 10 ऑगस्टला होणार सुनावणी

Newslive मराठी- कोरोनाच्या संकटात परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी मागणी करत विद्यापीठ अनुदान आयोगानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीला युवा सेनेसह देशभरातील काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. या याचिकांवर आज निकाल येण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयानं याचिकांवरील सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय आणखी लांबल्याची चिन्हं आहेत. विद्यापीठाच्या अंतिम […]

महाराष्ट्र लक्षवेधी शैक्षणिक

बारामतीत माय लेकराचे एकाच वेळी दहावीत यश संपादन

Newslive मराठी-  (रणजित कांबळे) बारामती तालुक्यातील पारवडी गावातील गुरव कुटुंबात दहावीच्या परिक्षेचा निकालाचा आनंद व्दिगुणित झाला आहे. कारण पण तसेच आहे. नुकताच इयत्ता दहावीचा निकाल लागला. या परीक्षेत वयाच्या 36 व्या वर्षी आईने आपल्या दोन्ही मुलांच्या मदतीने दहावीच्या परीक्षेत 64.40 टक्के गुण मिळवत अपुर्ण स्वप्न पुर्णत्वास आणले आहे. बेबी गुरव असे या आईचं नाव आहे. […]

बातमी महाराष्ट्र शैक्षणिक

मराठा तरुणांना आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण नाही; सरकारी जीआरवर विनोद पाटील आक्रमक

Newslive मराठी-  मराठा आरक्षणाचा वाद काही केल्या संपताना दिसत नाही. राज्य सरकारने मराठा समाजासह इतर आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या समाज घटकांना आर्थिक मागास घटकांच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचं परिपत्रक काढलं आहे. त्यामुळे यापुढे राज्यात मराठा समाजाला आर्थिक मागास घटकांतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. याविरोधात मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. […]

महाराष्ट्र शैक्षणिक

दहावीच्या निकालात राज्यात कोकण विभागाची बाजी

Newslive मराठी-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. यंदा दहावीच्या निकालात राज्यात कोकण विभागानेच बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त 98.77 टक्के लागला, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 92 टक्के आहे. दुपारी एक वाजल्यापासून […]

आंतरराष्ट्रीय देश-विदेश शैक्षणिक

घरी बसून पेपर द्या, या सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा

Newslive मराठी- कोरोनाच्या पार्शवभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या कि घेऊ नयेत, याबाबत काही महिन्यांपासून अनेक पेचप्रसंग चालू आहेत. परंतु, दिवसेंदिवस वाढती कोरोना संख्या आणि इतर घटक लक्षात घेऊन मध्यप्रदेश सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. अंतिम वर्षाच्या मुलांसाठी परीक्षा देण्यासाठी परीक्षा सेंटरवरती जाण्याची गरज नसून पेपर ऑनलाईन पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना घरात […]

महाराष्ट्र शैक्षणिक

शाळेत जाण्याची गरज नाही; सरकारचा मोठा निर्णय

Newslive मराठी- महाराष्ट्र सरकारने एका मोठा निर्णय घेत कलाकार खेळाडू, दिव्यांग विद्यार्थ्याना मोठी गुड न्यूज दिली आहे. त्यानुसार आता राज्यात नवीन एसएससी बोर्ड तयार करण्यात आला आहे. येत्या १० तारखेला ओपन एसएससी बोर्ड लाॅन्च करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. यामध्ये कलाकार खेळाडू दिव्यांग यांना शाळेत येण्याची गरज नाही कलाकार खेळाडूंसाठी नवीन एसएससी […]