आंतरराष्ट्रीयमनोरंजन

पुन्हा कॅटरिना- अक्षय एकत्र झळकणार

Newslive मराठी- कॅटरिना कैफची सलमान खानसमवेत जोडी जशी जमली तशी ती अक्षयकुमारबरोबरही जमली होती. दोघांनी ‘सिंग इज किंग’,‘नमस्ते लंडन’,‘वेलकम’,‘हमको दिवाना कर गये’ आणि ‘दे दना दन’सारखे चित्रपट दिले. ‘तिसमारखाँ’ हा या जोडीचा (सपाटून आपटलेला) शेवटचा चित्रपट. यामधील ‘शीला की जवानी’ हे गाणे गाजले.

आता पुन्हा एकदा ही जोडी आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातून समोर येणार असल्याची चर्चा आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात ही जोडी पाहायला मिळेल. अशी प्रेक्षकांची अपेक्षा असली तरी खुद्द रोहितने ही अफवा असून अद्याप काही नक्की झालेले नाही, असे म्हटले आहे.

या अभिनेत्रीला पाहण्यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याने बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते…

मला ही गोष्ट समजण्यासाठी ६-७ वर्ष लागली- स्वरा भास्कर

हार्दिक पांड्या असा नव्हता- एली अवराम