महाराष्ट्रराजकारण

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

अभिनेता सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांनी दिला आहे. पटनामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्हाचा तपास मुंबई पोलिसांनी वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चकरवर्तीने केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.

१४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत गेला. सुशांतने नेमकी आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास दीड महिन्याने त्याचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा पोलिसांकडे रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले. त्यांच्या तक्रारीवरून पाटणा पोलिसांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केला. बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीसच नव्हे तर दोन्ही राज्यातील सरकारमध्येही संघर्षमय वातावरण निर्माण झालं. या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षांची बाजू ऐकून सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.