मनोरंजनमहाराष्ट्र

चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला केंद्र सरकारची परवानगी- प्रकाश जावडेकर

कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर घेण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात चित्रीकरण ठप्प झाले होते. मात्र, अनलॉकच्या टप्प्यात काही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून सरकराने आता चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी नियमावली जारी केली आहे.

त्यात मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग सक्तीचे असून सुरक्षेसाठी इतर नियम पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी केंद्र सरकारने नियमावलीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.

मार्गदर्शक सूचनांमुळे या उद्योगाशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मदत होणार आहे, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. या सूचनांमध्ये सर्व ठिकाणी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे. चित्रिकरण स्थळी, रेकॉर्डिंग स्टुडीओ, एडिटिंग रूम्समध्ये वावरताना सहा फूटांचे अंतर राखणे आवश्यक आहे. चित्रिकरणादरम्यान कमीतकमी कलाकार आणि तंत्रज्ञ असावेत, असे जावडेकर म्हणाले.

कलाकार यांना सोडून सर्वांसाठी मास्क सक्तीचे आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन आवश्यक आहे.वस्तूंच्या वापरानंतर सॅनिटायझेशन आवश्यक चित्रिकरणादरम्यान कमीतकमी कलाकार आणि तंत्रज्ञ असावेत, इत्यादी प्रकारचे नियम लागू करण्यात आले आहेत.