महाराष्ट्रराजकारण

चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, “आम्हीपण तुमचे बाप आहोत हे लक्षात ठेवा”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लावला. पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वाया घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत असे ते म्हणाले.

पुणे महानगरपालिकेत प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाले आहे. या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहितरी जादू करून सर्व जागांवर भाजपाचे अध्यक्ष झाले पाहिले होते. असेही पाटील म्हणाले.

भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी असे आहेत ज्यांना सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत २८२ आणि सन २०२०च्या निवडणुकीत ३०३ खासदार आपले मिळाले आणि मदत करणारे सहयोगी खासदार सध्या १०३ वरुन १५३ आहेत, अशा एका प्रचंड मोठ्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.