महाराष्ट्रराजकारण

चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना खुलं आव्हान

Newslive मराठी –   महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना खुलं आव्हान दिलं. ते सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळ दौऱ्यात बोलत होते.

सरकारनं दुष्काळासंदर्भात केलेल्या कामांसंबंधीची आकडेवारी मी सर्वांसमोर मांडतो. त्यासाठी कोणीही चौकात चर्चा करायला बोलवलं तरी मी तयार आहे.

मग ते जाणता राजा असो किंवा कोणीही, असं पाटलांनी म्हटलं. तसंच, दुष्काळाचा फायदा घेत काहीजण राजकीय स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात आहेत, असा टोलाही त्यांनी लावला.