तंत्रज्ञान बातमी

१ जानेवारीच्याआधी बदलून घ्या डेबिट व क्रेडिट कार्ड

टिम Newslive मराठी:  मॅग्नेटिक स्ट्राइप डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर खबरदारी घेण्याची गरज आहे. ३१ डिसेंबर २०१८ च्या पूर्वीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ईएमव्ही चिप बेस्ड कार्ड बदलून घ्यावं लागणार आहे. अन्यथा आपलं कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला या कार्डांच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत.

डेबिट आणि क्रेडिट कार्डांद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठीच ईएमव्ही चिप कार्ड बंद करण्यात आले आहेत. आरबीआयच्या निर्देशानुसार, मेगास्ट्राइप कार्डाची वर्ष २०१८ मध्ये ईएमवी चिप बदलावी लागणार आहे. कारण मेगास्ट्राइप कार्डची वैधता 31 डिसेंबर 2018 पर्यंतच आहे. कार्ड बदलून घेण्यावर कोणतंही शुल्क आकारलं जातं नाही

दरम्यान, आपल्याला जर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड मॅग्नेस्ट्रिप आहे की नाही हे जाणून घ्यायचं असल्यास ते एटीएम कार्ड नीट पाहावे. जर त्या एटीएमवर कोणतीही चिप नसेल तर ते मॅग्नेस्ट्रिप कार्ड समजावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *