आंतरराष्ट्रीयलाइफस्टाईल

एयरटेलच्या ३९९ आणि ४४८ रूपयांच्या प्लॅनमध्ये बदल

Newslive मराठी:  रिलायन्स जिओ जेव्हापासून बाजारात दाखल झाले आहे तेव्हापासून कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. एकमेकांना टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या एकाहून एक आकर्षक असे प्लॅन जाहीर करत आहेत. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांना वेळोवेळी नवनवीन प्लॅन्स सादर करावे लागत आहेत. यासोबत आधीच्या प्लॅन्समध्ये बदलदेखील करावे लागत आहेत.

एयरटेलने आपल्या ३९९ आणि ४४८ रूपयांच्या दोन प्रिपेड प्लॅनमध्ये बदल केला असून याला सर्व सर्कल्समध्ये लागू करण्यात आले आहे.

३९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये आधी दररोज १.४ जीबी डाटा मिळत होता. यापुढे मात्र ग्राहकाला याऐवजी फक्त एक जीबी डाटा मिळणार आहे. यासोबत अमर्याद कॉलींगसह दररोज १०० एसएमएसदेखील देण्यात येणार आहे. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. ४४८ रूपयांच्या प्लॅनमध्ये आधी दररोज १.४ जीबी डाटा मिळत होता. या प्लॅनमध्ये यापुढे १.५ जीबी डाटा मिळणार आहे. म्हणजे यात डाटा वाढविण्यात आला आहे. यातही अमर्याद कॉलींगसह दररोज १०० एसमस मोफत मिळणार आहेत. तथापि, याची मर्यादा ८२ दिवसांची असणार आहे.