महाराष्ट्रराजकारण

मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता साधणार जनतेशी संंवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. कंगना प्रकरण, करोना, लॉकडाउन आणि मराठा आरक्षण या विषयांवर ते काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली आहे. या प्रकरणी अध्यादेश काढण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आम्ही तसूभरही मागे हटणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. आज होणाऱ्या त्यांच्या संवादात ते मराठा आरक्षण विषयावर नेमकी काय भूमिका घेणार आहेत हेदेखील मांडू शकतात.

cmomaharashtra च्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पेजवरुन उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं भाष्य केलं होतं. त्यानंतर बराच वाद झाला होता. या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगनाला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. आता आज जनतेशी जेव्हा मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत तेव्हा ते या मुद्द्यावर काय बोलणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.