महाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा; ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरुवात

राज्यातील गावागावात, घराघरात आरोग्य पथके जाणार असून तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये कायमस्वरुपी हॉस्पिटल उभारणार आहोत. राज्यात तीन लॅब होत्या. आता राज्यात ५३० लॅब तयार झाल्या आहेत. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आपला हात हीच आपली लस आहे. यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम सुरु करत आहोत.

दुबईत कायदे एवढे कडक आहेत की काही हजारांत दंड होतो. आपल्याकडे ते शक्य नाही. यामुळे जनतेला हित समजावले जाणार आहे, असे ठाकरे म्हणाले. याचबरोबर प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

आजपर्यंत आरोग्य हा विषय मागे पडला होता. मला तुमच्याकडून सहकार्य हवे आहे. जनतेला कोरोनासोबत कसे जगावे हे शिकविण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट हे शेवटचे आहे असे नाहीय. ही नांदी देखील असू शकते. लस कधी येणार माहिती नाही. गावागावात कोरोना दक्षता समिती स्थापण्यात येणार आहे. यामध्ये सर्व पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक आदी आहेत.

काही ठिकाणी अंमलबजावणी केली जात आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे आरोग्य सेवेवरील ताण कमी होईल. यामधील सुचनानुसार आवश्यक असेल तरच बाहेर पडा आदी सूचना आहेत. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर एक मोहिम राबविणार आहोत. यानंतरचा दुसरा टप्पा १२ ते २४ ऑक्टोबर असा आहे.