महाराष्ट्रराजकारण

पुण्याचा लॉकडाऊन उठवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता- संजय राऊत

जगात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढतच आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग पुणे शहरात झाला आहे. यामुळे आता पुण्यामध्ये अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. या परिस्थितीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तेथील लॉकडाऊन घाईघाईने उठविण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

कोरोनाचे संक्रमणाचा धोका पुण्यात वाढत आहे. तिथे अधिक लक्ष द्यायला हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आधीपासूनचे म्हणणे होते. तिथे घाईघाईने लॉकडाऊन उठविण्यात आला, त्यालाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोध होता, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. यामुळे राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावरच टीका केल्याचे बोलले जात आहे. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विरोधाकांना देखील खडसावले आहे.