आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

चीन भारताला सर्व बाजूंनी घेरतोय- शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी संरक्षणमंत्री शरद पवार हे कोरोना काळातही सक्रिय आहेत. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी भेटी दिल्या. आता चीन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांनी मुंबईत तज्ज्ञांना आमंत्रित करून त्यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मोदी सरकारला मोलाचा सल्लाही दिला आहे. ट्विट वरून पवारांनी या बैठकीची माहिती दिली आहे.

माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांना पवारांनी आपल्या निवासस्थानी चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. चीन विषयाचे गोखले यांनी आपले अनुभव सांगत सध्याच्या परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं. भूषण गोखले यांनी संरक्षणाची बाजू सांगितली अशी माहिती शरद पवारांनी दिली.

1990च्या दशकांमध्ये चीन दौऱ्यात आलेले अनुभव आपण सांगितले असंही पवारांनी म्हटलं आहे. दक्षिण चीन समुद्रात वाढत असलेलं चीनचं वर्चस्व हे गंभीर आहे. चीन भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत करत आहे असा इशाराही त्यांनी दिला.