महाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नागरिक असमाधानी- मनसे

कोरोना काळात मनसेने शिवसेनेवर अनेकदा टीका केली. आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर सर्वेक्षण घेतले होते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे.

समाजमाध्यमांवरुन विविध मुद्द्यांवर सात दिवसात नागरिकांचा कौल जाणून घेतला. 54 हजार 177 नागरिकांनी या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली मते नोंदवली व लॉकडाउन संपुष्टात आणण्याच्या बाजूने कौल दिला. तसेच 63 टक्के नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त केले आहे.

लॉकडाऊनमध्ये मनसेने राज्य सरकारवर अनेकवेळा टीका देखील केली. तसेच मनसेच्या वतीने अनेक गरजूंना मदत देखील करण्यात आली. गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मनसेने लोकांना मदत देखील केली. लॉकडाऊन तसेच लोकांची होणार गैरसोय यावर मनसे आवाज उठवत आहे.