महाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्र्यांनी ‘मातोश्री’च्या बाहेर पडावे; राजु शेट्टींची जोरदार टीका

मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीच्या बाहेर पडून राज्यात काय चालले आहे ते बघावे. तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ असे सुरू असल्याची टीका शेट्टी यांनी केली. माजी खासदर राजू शेट्टी यांनी आज बारामती शहरात दुधदरासाठी जनावरांसह आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.

बारामतीमध्ये ढोलताशाच्या गजरात जनावरांना घेऊन मोर्चाला सुरवात करण्यात आली. आला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. इंदापूर चौक, गुणवडी चौक, पानगल्ली मार्गे प्रशासनभवन येथे पोलिसांनी मोर्चा अडवला. यावेळी माजी खासदार शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षनेत्यांना खडे बोल सुनावले .

यावेळी सरकारी खरेदी होऊन देखील दुधाचे भाव वाढत नसल्याने ही दूध उत्पादकांची फसवणूकच आहे, असा आरोप करत त्यांनी दूध संघांनी दिलेल्या भावाची आकडेवारी वाचूनदाखवली. सरकारने दुध संघांना २५ रुपये प्रतिलीटर दर दिला,मात्र,शेतकऱ्यांना १७ रुपये दर मिळाला. हे सगळे जर मुख्यमंत्री बघत असतील तर शेतकऱ्यांना हातात लोढणे का घेऊ नये असा संतप्त सवाल शेट्टी यांनी यावेळी केला. आमची जनावरे सांभाळा नाहीतर दुधाला बाजारभाव द्या अशी मागणी त्यांनी केली.