आंतरराष्ट्रीयदेश-विदेशराजकारण

15 लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन- काँग्रेस

Newslive मराठी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली होती. मात्र त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. परंतु त्यांनी परदेशातून काळा पैसा परत आणून 15 लाख देऊ हे आश्वासन मात्र आता पूर्ण केले आहे.

केवळ काळ्या पैशाऐवजी परदेशातून कोरोना आणून देशाला 15 लाख कोरोनाचे रुग्ण दिले. त्याबद्दल आम्ही मोदीजींचे अभिनंदन करतो, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. सावंत म्हणाले धारावीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांची जगभरातून तारीफ केली गेली आहे.

परंतु भाजप नेत्यांच्या ते पचनी पडले नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही मोदीजींच्या अभिनव व अनोख्या उपचारपद्धतीप्रमाणे थाळ्या वाजवल्या, जनतेला भाभीजींचे पापड वाटले असते तर कोरोना नेस्तनाबूत झाला असता.

आज कोरोना रूग्णसंख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकाकडे वेगाने वाटचाल करत आहे. यावरून काँग्रेसने मोदींवर जोरदार टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-मुख्यमंत्री राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी हरकत नाही- शरद पवार

-व्याघ्र दिन एका दिवसापुरता मर्यादीत राहता कमा नये– मुख्यमंत्री

-“राम मंदिर बनताच करोना देशातून पळून जाईल”; भाजपाच्या महिला खासदाराचा दावा