महाराष्ट्र

काँग्रेसला शरद पवारांसारखा वकील लाभला आहे – देवेंद्र फडणवीस

Newslive मराठी-  काँग्रेसला शरद पवारांसारखा वकील लाभला असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते ख्रिश्चअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणावर बोलण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ख्रिश्चअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्वाचा माणूस आहे. याचा लाभ काँग्रेस पक्षाला झाला आहे. ईडीने हीच गोष्ट कोर्टा समोर सांगितली आहे. काँग्रेसने आणि गांधी कुटुंबानं याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, इटालिअन न्यायालयाने जे निर्णय दिले आहेत. त्यामध्ये चार वेळा सोनिया गांधींच नाव आलं आहे. त्यामुळे हे जे पुरावे समोर आले आहेत त्यावर काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे. ख्रिश्चन मिशेलला ताब्यात घेतल्यानंतर ईडी त्याच्याकडे चौकशी करीत आहेत. त्यामध्ये तो माहिती देत आहेत.