महाराष्ट्रलक्षवेधी

काँग्रेस नेत्याची क्वारंटाईन हटवण्याची मागणी; ‘कोकणी माणसाचा महिना फुकट जातोय’

 Newslive मराठी- गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्राचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या सणाच्यावेळी कोकणी माणूस हक्काने दोन तीन दिवस आधी येतो. आनंदाने तो सण साजरा करतो आणि जातो. एकतर यावर्षी महाराष्ट्रावर, देशावर आणि जगावर फार मोठं संकट आहे. त्यामुळे आता गणपतीरायाला साकडं घालण्यासाठी देखील आम्हाला 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे.

कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना 14 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार आणि रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी केली आहे.

माणिक जगताप म्हणाले, ‘नुकताच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश उत्सवात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणी जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या गणेश भक्तांना क्वारंटाईनचा निर्णय घेतला आहे. त्यांना 5 ऑगस्टच्या आधी आपआपल्या गावी पोहचायला सांगण्यात आलं आहे.

त्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. हे क्वारंटाईन देखील स्वतःच्या घरात नाही, तर गावाच्या बाहेर क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यांना गणेशोत्सव झाल्यावर पुन्हा मुंबईत परतल्यानंतर 7 दिवस क्वारंटाईन राहायचं आहे. म्हणजे आमच्या कोकणी माणसाचा जवळजवळ 1 महिना वाया जाणार आहे.’

या सर्व गोष्टींना माझा तीव्र आक्षेप आहे, त्या सरकारने मागे घ्याव्यात. मागील 5-6 महिने पाहिलं. आपल्याला कोरोनासोबत आपलं दैनंदिन आयुष्य सुरु ठेवावं लागणार आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय त्यांनी घेतला असं वाटत नाही. मागचा निर्णय लादला तसाच हाही निर्णय लोकप्रतिनिधींनी घेतला. तो ताबडतोब मागे घ्यावा आणि कोकणी माणसावरील संकट दूर करावं, अशी मागणी माणिक जगताप यांनी केली

महत्वाच्या बातम्या-

-जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 70 लाखांवर

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi