महाराष्ट्र राजकारण

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रचाराला लवकरच सुरूवात होईल…

Newslive मराठी- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच लोकसभा निवडणुकीचे कॅम्पेनिंग सुरू होईल. त्याला वेळ घालवून चालणार नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

जागा वाटपाचा विषय फार राहिलेला नाही. विधानसभेचा विषय लोकसभेनंतर घेतला जाईल, कोल्हापूरसह सातारा आणि हातकणंगलेची जागाही राष्ट्रवादीकडे असेल, आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासह इतर मित्रपक्षाद्वारे लढवली जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि मी चर्चा केली आहे. ज्या ठिकाणी जे प्रभावी आहेत, निवडणून येणाची क्षमता आहे तेथे त्यांना जागा देण्याचा निर्णय झाला आहे. असेही पवार यांनी सांगितले.

दरम्यान, सर्व मित्रपक्षांची आघाडी करून भाजपाला प्रत्युत्तर देणार असल्याचे स्पष्ट संकेत पवार यांनी दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *