इंदापूर महाराष्ट्र

काँग्रेसच्या बालेकिल्यात राष्ट्रवादीचा निधी

Newslive मराठी-  प्रतिनीधी (ऋषिकेश काळंगे) भिगवण येथील तक्रारवाडी गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाट्न सोहळा संपन्न झाला. तक्रारवाडी गावाला जास्तीत जास्त निधी मिळवून देऊ तसेच विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. या अगोदर इंदापूर तालुक्यासाठी पुनर्वसनाचा निधी या तालुक्याला माहित नव्हता तो आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न केला, विकासाचा नारळ आमच्या हस्ते फुटला नाही तरी चालेल परतुं विकासकामे करणे हेच आमचे कर्तव्य आहे. असं प्रतिपादन यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांना दिले.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

तक्रारवाडी गावासाठी पुनर्वसन निधी अंतर्गत  ६९ लाखांचा निधी मंजूर झाला. त्यामध्ये गावातील  शाळेला संरक्षणभिंत, सिमेंट काँक्रेटीकरण तसेच आमदार निधी आणि जिल्हा परिषदेतर्गत मंदिर सभामंडप, दलित वस्ती सिमेंट काँक्रेटीकरण सुशोभीकरण अशी अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. असंही भरणे यावेळी म्हणाले.

इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, कृ. उ. बाजार समिती सभापती आप्पासाहेब जगदाळे, आरोग्य व बांधकाम विभाग सभापती प्रविण माने, जि. प. सदस्य हनुमंत बंडगर आदि उपस्थित होते. यावेळी गावातील लोकांनी उपस्थित मान्यवरांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्ष सतीश वाघ, नितीन काळंगे, अंकुश वाघ, दिपक वाघ, माऊली जगदाळे, मनोज वांझखडे केतन वाघ आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *