आरोग्यमहाराष्ट्र

पशुपालकांनी प्राण्यांच्या तुटलेल्या हाडांना जोडण्यासाठी येथे संपर्क साधा…..

Newslive मराठी-  पशुपालकांना , IVRI, पुणे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून, गायी, म्हशी व इतर प्राण्यांमध्ये अस्थिभंगाच्या शस्त्रक्रीया शासकीय दरात केल्या जाणार आहेत.  दि 22 ते 25 जानेवारी, 2019 या कालावधीत तुटलेल्या हाडांना जोडण्याच्या विशेष शस्त्रक्रीया कौशल्यात वृद्धि करण्यासाठी, तज्ञ पशुवैद्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

पशु पालकांनी या कालावधीत मांडी किंवा खांदा यांच्या खालील हाडे मोडून जखमा झालेल्या असल्यास, शस्त्रक्रीया करण्यासाठी, त्वरित जिल्हा पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय, औंध, पुणे येथे संपर्क करावा.

दुरध्वनि ०२०२५६९२९६८, ९४०३९३०९४३. ‌डाॅ. धनंजय परकाले, अतिरिक्त आयुक्त पशु संवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे ‌