Newslive मराठी- परळी वैजनाथ (प्रतिनिधी) धनंजय मुंडेंनी पाच वर्षे सक्षम विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत राज्यभर सातत्याने दौरे केले. राज्यभरातील जनतेसोबत सातत्याने संवाद साधला सोबतच परळी मतदारसंघात विकास कामांचा सपाटा लावला होता.
त्यामुळे जनतेसोबत त्यांची घट्ट नाळ जोडल्या गेली आहे. विधानसभा निवडणूक घोषित झाल्यापासून धनंजय मुंडे परळी मतदारसंघ पिंजून काढून त्यांनी आजवर केलेल्या कामांचा पुराव्यानिशी लेखाजोखा मांडत आहेत तसेच भविष्यातील योजनांचा प्लॅन सांगत आहेत. मात्र यामुळे घाबरलेल्या पंकजा मुंडे मतदार संघातून पळ काढत आहेत.
एक आठवड्यावर निवडणूक आलेली असताना पंकजा मुंडे ह्या धनंजय मुंडेंच्या प्रचाराची कॉपी करताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे धनंजय मुंडेंनी शहरातील व्यापारी मंडळींशी संवाद साधत त्यांचा विश्वास जिंकला तोच कित्ता गिरवत पंकजा व्यापारी मेळावा घेण्यासाठी धडपडत आहेत पण त्याला प्रतिसाद कसा मिळेल या धास्तीने त्या सतत मेळावा पुढे पुढे ढकलत आहेत.
इतकेच काय मुंबई, नवी मुंबई, पुणे येथे कामानिमित्त राहणाऱ्या परळी मतदार संघातील लोकांशी धनंजय मुंडेंनी संवाद साधला तेव्हा हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते ( धनंजय मुंडेंच्या मेळाव्यातील तुफान गर्दी येथे एका क्लिकवर बघू शकता
आज पुण्यात राहणाऱ्या माझ्या परळीच्या बांधवांशी संवाद साधला. परळीकरांनी प्रचंड उत्साह दाखवला. परळीत राहणाऱ्या लोकांच्या मनात मला विजयी करण्यासाठी जितका उत्साह दिसतोय तितकाच उत्साह पुण्यात राहणाऱ्या परळीकरांमध्ये दिसतोय. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. @NCPspeaks#Election2019 pic.twitter.com/B0Vswo2Keh
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 6, 2019
हे बघून पंकजा यांनी औरंगाबाद येथे याचीच नक्कल करत मेळावा घेण्याचा प्रयत्न केला त्यात जेमतेम १०० लोक तिथे उपस्थित होते (स्वतः पंकजा यांनी ट्विट केलेले फोटो बघा
आज औरंगाबाद शहरात 'संवाद आपल्या माणसाशी' या कार्यक्रमात परळी मतदार संघातील मतदारांशी संवाद साधला. मुंडे साहेबानी 1980 पासून प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघाचे मला सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याचे आवाहन केले. pic.twitter.com/ToOSNLTUAm
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 10, 2019
प्रचारात विविध समाजातील मंडळींशी धनंजय मुंडे संवाद साधत आहेत. धनंजय मुंडे यांच्या मेळाव्यानंतर किंवा नुसत्या घोषणेनंतर विरोधीपक्ष असलेला भाजप त्याच पद्धतीने नियोजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
तीच गत डिजिटल प्रचारात सुरू आहे. धनंजय मुंडेंची प्रचार यंत्रणा भाजपच्या अपयशाचे नाविन्यपूर्ण ऑडिओ व्हिडीओद्वारे पोलखोल करत आहे. त्यांनंतर भांबावून गेलेल्या पंकजा आणि त्यांची यंत्रणा स्वतःचे थातूरमातूर समर्थन करणारे व्हिडीओ प्रसारित करत आहेत. हे सर्व बघून धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या पंकजा यांना जनता आता “कॉपी ताई” म्हणू लागली आहे.
रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैध !
मित्रा मराठीत लिहायचं रे… पार्थ पवार ट्रोल
मोदी चुकीचे बोलले, बुद्ध काही उपयोगाचा नाही – संभाजी भिडे
बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi