कोरोनादेश-विदेश

करोना – २४ तासांमध्ये देशात १००७ जणांचा मृत्यू आणि ६४,५५३ नवे रुग्ण

Newsliveमराठी – जगात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.तर देशात दररोज ६० हजारांच्यापुढे करोनाबाधित रुग्ण आढळत आहे. मागील २४ तासांत देशात ६४ हजार ५५३ करोनाबाधित रुग्ण आढळे तर १००७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या २४ लाख ६१ हजार १९१ वर पोहोचली आहे.

आतापर्यंत देशात ४८ हजार ४० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ चोवीस तासांमध्ये एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दैनंदिन करोनामुक्त रुग्णांचीही विक्रमी नोंद झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये ५६,३८३ रुग्ण बरे झाले. हे प्रमाण ७०.७६ टक्क्यांवर पोहोचले असून सुमारे १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्ण ६,६१,५९५ आहेत. मृत्यू दर दोन टक्क्यांपेक्षाही कमी १.९६ टक्क्यांवर आला आहे.