देश-विदेशबातमी

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यावर कोरोनाचे सावट

Newslive मराठी- देशात सर्वांत चर्चेत असणारा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा येत्या 5 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. मात्र त्या अगोदर मंदिरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मंदिरातील पुजारी आणि तिथे तैनात असणाऱ्या 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीमुळे काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या भूमिपूजन सोहळ्यावर चिंतेचे ढग घोंगावताना दिसत आहेत. नुकतीच ही बाब समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्येत पुढच्या आठवड्यात राममंदिराच्या भूमी पूजनाचा सोहळा पार पडणार आहे.

मात्र मंदिराचे पुजारी प्रदीप दास आणि मंदिरातील सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या 16 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे प्रदीप दास हे शिष्य आहेत. तसेच राम लल्लाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी ते सहभागी होणार होते.

यावेळी मंदिरात 4 पुजारी असून सत्येंद्र दास यांच्यानंतर प्रदीप दास यांचाच क्रमांक लागतो. दरम्यान, मंदिर परिसरात राहणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याने अयोध्येत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारण 5 ऑगस्टला पंतप्रधान मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे इथली व्यवस्था ही निरोगी आणि सुरक्षित राहणे गरजेचे आहे. देशातील अनेक मोठे नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामुळे आता आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा