कोरोनामहाराष्ट्र

देशात 24 तासांत कोरोनाने मोडले सर्व रेकॉर्ड!

दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 44 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 95 हजार 735 नवीन रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी 6 सप्टेंबर रोजी 93 हजार 723 कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात 1172 जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या 75 हजार 62 झाली आहे. ही एक धक्कादायक बाब आहे.

यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे, जेथे सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात 34 लाख 71 हजार 784 रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट 77.74% आहे. असे असले तरी देशात अजूनही 9 लाख 19 हजार 18 अँक्टिव्ह रुग्ण आहेत.भारतातील मृतांची संख्या वाढत आहे. जगात तिसऱ्या क्रमांकावर रूग्णसंख्येत भारताचे नाव आहे.

जगभरातील एकूण रुग्णांच्या 54 टक्के रुग्ण हे अमेरिका, भारत आणि ब्राझीलमधील आहेत. या तीन देशांमध्ये सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळण्याची शक्यता आहे यामुळे पुढील काळात काळजी घेल्याची गरज आहे.