कोरोनामहाराष्ट्र

कोरोनामुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक- प्रकाश आंबेडकर

देशात कोरोनामुळे सर्वकाही ठप्प आहे. देशात आणि महाराष्ट्रात दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. कोरोनामुळे देशात ६४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. ही आकडेवारी धक्कादायक आहे.

असे असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरोनामुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत, असा दावा केला आहे. कोरोना आहे, यावरही आपला विश्वास नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोना आणि परिस्थितीवर भूमिका मांडली. या प्रतिक्रियेमुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.