कोरोनादेश-विदेश

कोरोनाचे एका दिवसात ६४,३९९ रुग्ण

Newsliveमराठी– देशात रविवारी रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदविण्यात आला. गेल्या २४ तासांत ६४,३९९ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या २१ लाख ५३ हजारांवर पोहोचली आहे.

मात्र, देशातील कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले असून, गेल्या २४ तासांत सात लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत २ कोटी ४१ लाख ६ हजार ५३५ इतक्या चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले.

गेल्या २४ तासांत करोनाचे ५३,८७९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १४,८०,८८४ इतकी झाली आहे. देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाण ६८.७८ टक्के झाले आहे.

दैनंदिन चाचण्यांची संख्या वेगाने वाढत असून, गेल्या अनेक दिवसांपासून देशात ६ लाखांहून अधिक नमुने तपासले जात आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली. गेल्या २४ तासांत विक्रमी ७ लाख १९ हजार ३६४ नमुने तपासण्यात आले असून आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे, असे आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि माध्यम समन्वयक डॉ. लोकेश शर्मा यांनी सांगितले आहे.