कोरोनामहाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी आली समोर

देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहेत. राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान राज्यात १५,७६५ नवीन रुग्णांचे निदान झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात १५,७६५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८,०८,३०६ झाली आहे. तर राज्यात आज रोजी एकूण १,९८,५२३ ॲक्टिव्ह रुग्ण सापडले आहेत. आज १०,९७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ५,८४,५३७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ७२.३२ % एवढे झाले आहे. रोज धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. कोरोनावर कधी लय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.