आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम; रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल

कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. याचत आरबीआयने 2019-20 चा वार्षिक आर्थिक अहवाल जाहीर केला. यामध्ये कोरोना संकटामुळे देशातील आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला असल्याचे दिसले आहे. त्यात उत्पादन व पुरवठा साखळीवर परिणाम होऊन ती मंदावली आहे. याकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आली आहे. रोजगार निर्मिती कमी झाली आहे. अनेकांचे रोजगार देखील गेले आहेत. कोरोनाकाळात संथ गुंतवणूकीमुळे कोविड काळात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

आरबीआयचा 2019-20 चा वार्षिक अहवाल वाढती गुंतवणूक आणि सुधारणांवर केंद्रित आहे. यामध्ये आरबीआयने म्हटले आहे की, दुस-या तिमाहीतही आर्थिक व्यवहारांमध्ये कोरोनाचा परिणाम दिसून येईल. कोरोनामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळीत असमतोल निर्माण झाला आहे. आरबीआयने गुंतवणूकीसाठी सुधारणांची शिफारस केली आहे. या अहवालात आरबीआयने 2040 पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 4 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे सांगितली आहे.

2019-20 मध्ये एकूण निव्वळ उत्पन्न 1.50 लाख कोटी रुपये होते. मागील वर्षात याच कालावधीत एकूण निव्वळ उत्पन्न 1.95 लाख कोटी रुपये होते, जे आता 1.50 लाख कोटींवर गेले आहे. आरबीआयकडे 30 जूनपर्यंत एकूण ठेव 11.76 लाख कोटी होती. यामुळे आता अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील.