कोरोनामहाराष्ट्र

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’नंतर गोविंदबागमध्येही कोरोनाचा शिरकाव!

कोरोना राजकीय नेत्यांच्या घरी सुद्धा पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बारामती येथील गोविंद बागेतील निवासस्थानातील 4 कर्मचाऱ्यंना कोरोनाची बाधा झाली आहे.

त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानीदेखील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मुंबईत सिल्व्हर ओक येथे कोरोनाचे 16 रुग्ण आढळल्यानंतर शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानातील 50 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असून त्यांच्या संपर्कातील इतर लोकांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे समजते. बारामतीतही कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथील घरगुती तसेच कार्यालयीन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तेथील 12 कर्मचारी या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामध्ये 3 अंगरक्षकांचा समावेश होता. विशेष म्हणजे स्वतः शरद पवार आणि त्याचे कुटुंबीय कोरोना निगेटिव्ह आढळले होते. आता परत कुटुंबातील सदस्यांची टेस्ट करण्याची शक्यता आहे.