महाराष्ट्रराजकारण

एका व्यक्तीच्या चुकीमुळे देशात कोरोनाचा उद्रेक झाला- राहुल गांधी

कोरोनावरून पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज पुन्हा 92 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 48 लाखांच्या पुढे गेला आहे. देशात कोरोना रुग्णवाढीबाबत काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

राहुल यांनी ट्विट करत सांगितले आहे की, या आठवड्यात देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाखांच्या पुढे, तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 10 लाखांच्या पुढे जाणार आहे. देशात लॉकडाऊनचे योग्य नियोजन करता न आल्यामुळे एका व्यक्तीच्या अहंकारामुळे देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारतवर सुद्धा राहुल यांनी टिका केली आहे. राहुल यांनी सांगितले की, मोदींनी देशवासीयांना संबोधले होते की, आत्मनिर्भर व्हा याचा अर्थ असा होतो की, आपला जीव आपण स्वत: वाचवा. कारण देशातील पंतप्रधान कोरोनाच्या काळात देशाला आत्मनिर्भर करून मोरांसोबत व्यस्त आहे, अशी खिल्ली सुद्धा राहुल यांनी उडवली आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे.