कोरोनादेश-विदेश

करोना – देशात रुग्णांमध्ये उच्चांकी वाढ

Newsliveमराठी– देशात सलग दुसऱ्या दिवशी करोना रुग्णांमध्ये उच्चांकी वाढ झाली असून गेल्या २४ तासांमध्ये ६६ हजार ९९९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३७ वर पोहोचली आहे.

आतापर्यंत ४७ हजार ३३ मृत्यू झाले असून गेल्या २४ चोवीस तासांमध्ये ९४२ रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दैनंदिन करोनामुक्त रुग्णांचीही विक्रमी नोंद झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये ५६,३८३ रुग्ण बरे झाले. हे प्रमाण ७०.७६ टक्क्यांवर पोहोचले असून सुमारे १७ लाख रुग्ण बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्ण ६,५३,६२२ आहेत. मृत्यू दर दोन टक्क्यांपेक्षाही कमी १.९६ टक्क्यांवर आला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या. बुधवारी दिवसभरात ८.३ लाख चाचण्या केल्या गेल्या. एकूण २.६८ कोटी चाचण्या झाल्या असून १० लाख लोकसंख्येमागे १९ हजार ४५३ चाचण्या केल्या जात आहेत. या आठवडय़ात प्रतिदिन ६ लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या गेल्या आहेत.