बातमीमहाराष्ट्र

कोरोना चाचणीसाठी आलेल्या तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला स्वॅब

Newslive मराठी- राज्यावर कोरोनाचं संकट असताना अमरावतीमधील एक संतापजनक घटना समोर आली आहे. करोना चाचणीसाठी आलेल्या 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी कारवाई करत कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अटक केली आहे.

अल्पेश देशमुख असं अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. बडनेरा मार्गावरील एका मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानमध्ये काम करणारा एक कर्मचारी 24 जुलै रोजी करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. पीडीत तरुणी तिथे काम करत होती. यामुळे त्याच्या संपर्कातील सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता.

तिथे काम करणारे 20 कर्मचारी मंगळवारी बडनेरातील मनपाच्या मोदी हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी गेले होते. यामध्ये काही महिला कर्मचारीही होत्या. दरम्यान एका 24 वर्षीय तरुणीच्या नाकातून स्वॅब घेतल्यानंतर त्या ठिकाणी स्वॅब घेण्यासाठी कार्यरत कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञाने गुप्तांगाचा स्वॅब घ्यावा लागतो, असे सांगून स्वॅब घेतला.

वास्तविकता कोविड चाचणीसाठी नाक, घसा या दोनच ठिकाणचे स्वॅब घेतले जातात. ही बाब लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी या प्रयोगशाळा तंत्रज्ञाविरुध्द बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

महत्वाच्या बातम्या-

-‘त्या’ पीडितेला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार खासदार नवनीत राणा

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-मराठा तरुणांना आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण नाही; सरकारी जीआरवर विनोद पाटील आक्रमक

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi