कोरोनामहाराष्ट्र

जानेवारीत येणार कोरोना लस- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

सध्या देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ लागली आहे. अनेक रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत कोरोना लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या लसीसंदर्भात एक गूड न्यूज जाहीर केली आहे.

ते म्हणाले की 2021 च्या सुरुवातीला कोरोनची लस येऊ शकते, असे हर्षवर्धन यांनी आज जाहीर केले आहे. मात्र लस नेमकी कोणत्या तारखेस येईल हे सांगणे मात्र कठीण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हायरिस्क असणाऱ्य़ांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळत आहेत. यामुळे लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.