आंतरराष्ट्रीयदेश-विदेश

देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

Newslive मराठी- जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा संसर्ग देशभरात झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता 15 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर मागील 24 तासांत देशात 48 हजार 512 नवे कोरोनाबाधित आढळले तर 768 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 15 लाख 31 हजार 699 वर पोहचली आहे. सद्यस्थितीस देशात करोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 लाख 9 हजार 447 आहे. तर, 9 लाख 88 हजार 30 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेला आहे.

देशात आतापर्यंत करोनामुळे 34 हजार 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशात 28 जुलैपर्यंत कोटी ७७ लाख ४३ हजार ७४० नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. या पैकी लाख हजार ८५५ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआर (इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्चन) कडून ही माहिती मिळाली आहे.