महाराष्ट्रराजकारण

कोरोना व्हायरस नष्ट झाला; भाजप नेत्याचा दावा

कोरोना महामारीचा देशातील विळखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाखांच्या पुढे गेली आहे तर मृत्यूची संख्या ७६ हजार २७१ इतकी झाली आहे. अशातच पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी एक अजब दावा केला आहे. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे, कोरोना व्हायरस नष्ट झाला,’ असा अजब दावा घोष यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील हुगळीमध्ये एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ते म्हणाले, ‘काहींना या ठिकाणी गर्दी पाहून आजारी पडल्यासारखे वाटत असेल. मात्र ते कोरोनामुळे नाही तर भाजपाच्या भीतीने आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे,’ असे घोष म्हंटले आहे.

असे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे. गायीच्या दुधामध्ये सोने असते. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावा याआधी दिलीप घोष यांनी केला होता. यामुळे त्यांच्यावर आता टीका होत आहे. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकरची वक्तव्ये केली आहेत.