महाराष्ट्रराजकारण

21 दिवसांत कोरोना संपवणार होत, पण संपवले कोट्यवधी रोजगार- राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे. देशात कोरोनानं पाऊल ठेवल्यानंतर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला.

अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाउन असंघटित क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. वचन दिलं होत २१ दिवसांत कोरोना संपवण्याचं, पण संपवण्यात आले कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग, असं म्हणत राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

‘अर्थव्यवस्था की बात’ कार्यक्रमातून मोदी सरकारनं घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावर राहुल गांधींनी टीका केली आहे. २१ दिवसांच्या या लॉकडाउननंतर त्यात वाढ करण्यात आली. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. २१ दिवसांच्या काळात कोरोनाला नष्ट करू, असं मोदी लॉकडाउनची घोषणा करताना म्हणाले होते.

लॉकडाउन कोरोनावर आक्रमण नव्हतं. लॉकडाउन देशातील गरिबांवरील आक्रमण होतं. युवकांच्या भविष्यावर आक्रमण होतं. लॉकडाउन मजूर, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर आक्रमण होतं. आपल्या असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण होतं. आपल्याला हे आक्रमण समजून घ्यावं लागेल. या आक्रमणाविरोधात उभ राहावं लागेल, असं आवाहन राहुल गांधी यांनी देशवासियांना केलं.