आरोग्यमहाराष्ट्र

दिवाळीपर्यंत कोरोना नियंत्रणात येईल; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

भारतात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. जवळपास ३५ लाखांचा आकडा रुग्णसंख्येने पार केला आहे. संपूर्ण जगात या लस संदर्भातसंशोधन सुरु आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी होण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

ते म्हणाले, ‘ दिवळीपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाला मोठं यश मिळेल, कोरोनाचं संक्रमण पुढच्या काही महिन्यात नियंत्रणात येईल. कोरोनाने आपल्या जीवनशैलीत बलद घडवून आणला. आरोग्याबाबत अधिक सतर्क आणि सावध राहायला हवं. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होईल’. अशी माहिती आरोयमंत्र्यांनी दिली.

दरम्यान भारतामध्ये कोरोना संक्रमणाने धुमाकूळ घातला आहे. ऑगस्टच्या शेवटी कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार 24 तासांत देशात पहिल्यांदाच 78 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 लाख 42 हजार 734 वर पोहोचला आहे.