महाराष्ट्रराजकारण

कोरोनाच्या नावाखाली महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्टाचार; चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

Newslive मराठी- कोरोना महामारीवरून राज्यात चांगलंच राजकारण तापल्याचे दिसत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी यावरून राज्य सरकावर टीका केली आहे. सरकार रोज असे निर्णय घेत आहे की सर्वसामान्यांना त्रास होईल, खत बी-बियाण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. खत मिळत नाहीत, हे सरकार बांधावर खत बी बियाणे देणार होते? कसलं बांधावर, दिवसभर रांग लावली तर एक खताच पोत मिळतंय का?. या सरकारने नेमकं ठरवलं आहे तरी काय? शेतकऱ्यांना मारून टाकायचय का? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी भाजपा जेवढे प्रयत्न करत आहे, तेवढं महाविकासआघाडी सरकार करत नसल्याचे सांगत, कोरोना महामारीविरोधात लढण्यास लागणाऱ्या पीपीई किट, तात्पुरत्या उभा करत असलेल्या कोविड सेंटर, मृतदेहाला लागणाऱ्या बॅगा यात या सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

धारावीत दीडशे रुपयांना पीपीई किट मिळतं, ब्रँडेड साडेचारशे मग १३०० रुपयांना किट हे सरकार घेत असून, कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यास मोकळे आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले. दूध दर वाढीसाठी महाराष्ट्रात भाजपाकडून शनिवारी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी मावळमध्ये आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, कोरोनाकाळात आम्ही जेवढ करत आहोत तेवढं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसपण करत नाही. 40 लाख लोकांना किराणा सामानाचे पॅकेट्स दिले. नागरिकांची स्क्रिनिंग आम्ही करत आहोत. हिंजवडीत 104 बेडचं कोविड सेंटर उभारलं आहे. असे गावोगावी सुरू करत आहोत.

कोणाकडे आम्ही दुर्लक्ष करत नाहीत. राज्य सरकारवर टीका करताना पाटील म्हणाले, जीएसटीमधून १९ हजार कोटी आलेत तुम्ही एक रुपयांच पॅकेज सामान्य नागरिकांना दिले नाही? भ्रष्टाचार करायला हे मोकळेच आहेत आणि आम्ही सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे नाहीत, असा सवाल करत, या महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही त्यांनी आरोप केला. यावरून आता जोरदार राजकारण पेटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले– राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi