बारामती महाराष्ट्र

बारामतीत सीरआरपीएफच्या जवानाला पोलिसांकडून बेदम मारहाण

Newslive मराठी- श्रद्धांजली सभेची परवानगी मागण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट आल्याचे कारण देत बारामती पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे वर्दीत होते. तरीही बारामती तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिसांनी सीआरपीएफच्या जवानाला खोलीत डांबून मारहाण केली.

माझी वैद्यकीय तपासणी करा. त्यातून सत्य समोर येईल’, असं त्या जवानांन पोलिसांना सांगितलं. मात्र, पोलिसांनी त्याचं ऐकून घेतलं नाही. उलट १६ पोलिसांनी मिळून त्याला मारहाण केली.

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरात निषेध होत असतानाच हा प्रकार समोर आला आहे.

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…

पंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…

भारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करू- पुतिन

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *