कोरोनामहाराष्ट्र

सुरक्षेसाठी एसटी बसेसमध्ये महामंडळाने बसवले पडदे

कोरोनामुळे एसटी बस बंद आहेत. सध्या काही प्रमाणात बस सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी सध्या निम्म्या क्षमतेने प्रवासी घेऊन तोट्यात धावणाऱ्या एसटीच्या काही गाड्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पडदे बसवले आहेत. सध्या काही गाड्यांमध्ये ही सुविधा दिली आहे. लवकरच इतर गाड्यांमध्येही अशा प्रकारे व्यवस्था केली जाईल.

राज्यातील एसटीचा तोटा कमी करण्यासाठी परिवहन मंडळाने मार्च व एप्रिल महिन्यात भारमान वाढवा अभियान जाहीर केले होते. परंतु मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर 23 मार्चपासून एसटीचे चाक थांबले. भारमान वाढवा अभियानातच एसटी बंद राहिली. तसेच उन्हाळी सुटी म्हणजे एसटीच्या उत्पन्नवाढीचा काळ देखील कोरोनामुळे वाया गेला.

तरीही प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरवताना लॉकडाउन काळात जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतिय मजूर, विद्यार्थी आदींना सोडण्यासाठी एसटी धावली. तोट्यात असलेल्या मंडळाने अजून खर्च केला आहे. त्यामुळे आता तरी तोटा भरून निघणार का हा प्रश्न आहे. कोरोनामुळे अनेक लोक शक्यतो आता बसने प्रवास करत नाहीत. यामुळे थोड्याच बस धावत आहेत.