महाराष्ट्रराजकारण

लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर सायबर सेलची नजर

Newslive मराठी- लोकसभा निवडणुकीत सोलापूरात सोशल मीडियावर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे.

निवडणुकीच्या काळात या माध्यमांचा वापर काळजीपूर्वक व्हावा, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, या दृष्टीने पोस्ट होणाऱ्या मजकूरावर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे.

त्यामुळे वादग्रस्त पोस्ट टाकून भवितव्य धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.