आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

सुशांत सिंह राजपूतला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांतसिंग याने आत्महत्या केली. आता त्याचा दादासाहेब फाळके आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा सन्मान केला जाणार आहे. सुशांतला मरणोत्तर पुरस्कार दिला जाणार आहे. हा एक मोठा पुरस्कार मानला जातो.

दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे. मात्र हा सोहळा नेमका कोणत्या दिवशी होणार याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. त्याची बहीण हा पुरस्कार स्वीकारण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीकडून सुशांत सिंह राजपूतचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने स्विकारला होता. दरम्यान, 14 जूनला सुशांतचा मृत्यू झाला. मुंबईतील वांद्र्यातील राहत्या घरात सुशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.