आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

बिअर ग्रील्ससोबत आता खतरोंके खिलाडी अक्षय कुमारही दिसणार

अक्षय कुमारने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारने संपूर्ण चित्रपटसृष्टीत ‘खतरोंके के खिलाडी’ अशी ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे जगात कुठल्याही जंगलात किंवा पाण्यात निर्भीडपणे वावरणारा बिअर ग्रील्स. आता अक्षय कुमार लवकरच ‘इंटू द वाईल्ड विद बिअर ग्रील्स’ या कार्यक्रमात दिसणार आहे. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार रजनीकांत देखील या कार्यक्रमात दिसले होते.

अक्षय कुमारने या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार बिअर ग्रील्ससोबत जंगलात फिरताना दिसत आहे. या एका मिनिटाच्या व्हिडिओत अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून येताना दिसत आहे. यात ते दोघे पाण्यात पोहताना, रस्सीवर लटकताना तसेच प्राण्यांचा सामना करताना दिसत आहेत.

डिस्कव्हरी चॅनेलने ट्विट करून सांगितले की हा भाग खूपच मजेशीर होणार आहे.’ हा भाग ११ सप्टेंबर रोजी प्रसारित केला जाणार आहे. यामुळे या कार्यक्रमाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.