तंत्रज्ञान

इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि युट्युबच्या 23.5 कोटी युजर्सचा डेटा लीक

Newsliveमराठी – इन्स्टाग्राम, टिकटॉक किंवा युट्युब वापर करणाऱ्यांसाठी हि बातमी धक्कादायक आहे. जगभरातील 23.5 कोटी इन्स्टाग्राम, युट्युब आणि टिकटॉक युजर्सची खासगी माहिती सार्वजनिक म्हणजेच लीक झाली आहे. हा डेटा लीक झाल्याची माहिती सिक्योरिटी रिसर्च कंपनी कॉमपेरीटेकने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 100 मिलियन इंस्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाला आहे, ज्यात युजर्सच्या प्रोफाइलबद्दल संपूर्ण माहिती आहे. तसेच, 42 मिलियन टिकटॉक युजर्सचा डेटा लीक झाला आहे, तर 4 मिलियन यूट्यूब युजर्सची वैयक्तिक माहिती धोक्यात आहे. लीक केलेल्या डेटामध्ये प्रोफाइल नाव, अकाऊंट डिस्क्रिप्शन, अकाऊंट इंगेजमेंट, फॉलोअर्सची संख्या, फॉलोअर्स ग्रोथ रेट, ऑडियंस एज, लोकेशन, लाइक्स यासारख्या माहितीचा समावेश आहे.

लीक करण्यात आलेला डेटा हॅकर्स आणि स्कॅमर्स कोणत्याही कारणासाठी वापरू शकतात. या माहितीचा वापर करून हॅकर्स तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात. याशिवाय, तुमच्या नावाचा आणि प्रोफाइलचा गैरवापरही होऊ शकतो. दरम्यान, आतापर्यंत डेटा लीकच्या सोर्सबाबत अचूक माहिती मिळाली नाही. मात्र, पहिल्या दृष्टीक्षेपात, या डेटा लीकचे कारण अनसिक्योर डाटाबेस असल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी भारतात यूपीआय डेटा लीकचा रिपोर्ट समोर आला होता. यूपीआय डेटा लीक देखील अनसिक्योर डाटाबेसमुळे झाला होता. इन्स्टाग्राम, युट्युब आणि टिकटॉकच्या युजर्संना डेटा लीक संदर्भात माहिती कॉमपेरिटेकच्या एका रिसर्चने एक ऑगस्टला दिली होती.